Netherlands : नेदरलॅंडमध्ये सध्या शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन, शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले
Netherlands : नेदरलॅंडमध्ये सध्या शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरु आहे. सरकारी धोरणांच्या विरोधात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. जर्मनीत जाणाऱ्या मुख्य महामार्गासह अनेक मार्गावर कोंडी निर्माण झाली आहे. अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी नेदरलँड सरकारने नवीन धोरण आणलं आहे. या धोरणाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. नेदरलँड अनेक वर्षांपासून नायट्रोजन उत्सर्जनामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देत आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारने अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी, शेती आणि पशुपालनासाठी खतांच्या वापरावर अनेक निर्बंध आणले आहेत
Tags :
Maharashtra News Netherlands Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Farmer Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv