T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत

Continues below advertisement

T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत

हेही वाचा : 

चांगली बॅटिंग करण्यासाठी तंत्राची गरज : सुनंदन लेले

आयरलँडला सुरुवातीला कमी धावसंख्येत रोखता आलं नंतर बॅटिंग करुन दणदणीत विजय मिळवता आला. भारतासाठी हा प्रवास सुखकर राहिला आहे.  अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करण्यासाठी तंत्राची गरज लागणार आहे.नुसतं पाय पुढं टाका फिरवा पंखा असं करता येणार नाही, असा इशारा सुनंदन लेले यांनी भारतीय फलंदाजांना दिला. भारतानं आजच्या मॅचमध्ये सर्व बॉक्सेस टीक केलेत त्याचा फायदा संघाला नक्की होईल, असं सुनंदन लेले म्हणाले.

आजच्या विजयातून काय शिकण्यासारखं याचा उहापोह भारतीय संघ व्यवस्थापनाला करावा लागेल.एक दिवस विश्रांती घेऊन चांगल्या सरावासाठी ते मैदानात उतरतील. भारतीय  संघाला याची पूर्ण कल्पना आहे. आयरलँड विरुद्धच्या विजयानं फार हुरळून जायची गरज नाही. पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. जसा भारतीय मारा तिखट आहे, तसा पाकिस्तानचा सुद्धा आहे, असंही सुनंदन लेले यांनी म्हटलं. 

त्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करु शकणारा संघ जिंकणारा याची कल्पना रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांना आहे. त्याचीच तयारी केली जाणार आहे, असं सुनंदन लेले म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram