Superbug : जगासमोर सुपरबगचा किती धोका? ABP Majha

Continues below advertisement

जगासमोर आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलंय. हा धोका आहे सुपरबगचा. सुपरबग म्हणजे असा एक जीवाणू ज्याच्यावर कोणत्याही अँटिबायोटिक्सचा परिणाम होत नाही. याच सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी १३ लाख लोकांचा मृत्यू होतो. मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आलीय. त्याआधी २०४ देशांमधील अनेक अहवालांचा अभ्यास करुन हा आकडा जाहीर करण्यात आलाय. आयसीएमआर आणि एएमआरचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. कामिनी वालिया यांनी हा अभ्यास महत्वपूर्ण असल्याचं म्हटलंय. कारण २०१९ मध्ये सुपरबगमुळे मृत्युंपैकी जवळपास चार लाख मृत्यू हे दक्षिण आशियात झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram