Kargil Cargo Plane : लष्करी मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग,धावपट्टीवर रात्रीच्या अंधारातील थरार
Continues below advertisement
कारगिलमधील उंचावरील धावपट्टीवर रात्रीच्या अंधारात सी-130 या लष्करी मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आलंय. सैन्याची तुकडी, लष्करी वाहनांची वाहतूक करू शकणारे सुपर हर्क्युलस विमान अशा प्रकारे प्रथमच रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या सीमेलगत उतरवण्यात आले आहे. कारगीलमधील ही अतिउंचावरील धावपट्टी असून, हा परिसर उंच टेकड्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत येथे विमान उतरवणे अत्यंत अवघड मानले जाते. त्यातही रात्रीच्या अंधारात उतरणे आणखी आव्हानात्मक आहे. मात्र आपल्या हवाई दलाने ही कामगिरी फत्ते केली आहे.
Continues below advertisement