New York Snowfall : न्यूयॉर्कमध्ये बर्फाचं वादळ, रस्त्यावर साचलं 6 फूट बर्फ
न्यूयॉर्कसह अमेरिकेतील अनेक राज्यात बर्फाच्या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालीय.. न्यूयॉर्कमधील रस्त्यावर बर्फाचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय. जागोजागी सहा फूटापर्यंत बर्फ साचलाय.. हिमवृष्टीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झालाय.. येत्या २४ तासात आतापर्यंतची सर्वात मोठ्या हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय..