Sitarang Cyclone : सिंतरंग चक्रीवादळामुळे 24 जणांचा मृत्यू, प. बंगालमधील हजारो नागरिकाचं स्थलांतर

Continues below advertisement

सध्या सितरंग चक्रीवादळाचा (Sitrang Cyclone) धोका पाहायला मिळत आहे. बांगलादेशमध्ये कहर माजवल्यानंतर सितरंग चक्रीवादळ जमिनीवर धडकलं आहे. पण याचा परिणाम कायम राहणार आहे. भारतात काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारताशेजारील बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा झटका बसला आहे. आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं सितरंग चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारट्टीवर धडकलं. सितरंग चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये आतापर्यंत सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात अलर्ट देण्यात आला आहे. भारतातही काही भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram