California : कॅलिफोर्नियाच्या साक्रमेंटो शहरात गोळीबाराच्या घटना, 6 जणांचा मृत्यू
California : कॅलिफोर्नियाच्या साक्रमेंटो शहरात गोळीबाराच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय. तर बारा जण जखमी झालेत. काल सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर लोक रस्त्यावरून सैरावैरा धावतानाचा व्हिडीओ काहींनी ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओत गोळीबाराचा आवाजही ऐकू येत होता