Saif al Adel : कुख्यात दहशतवादी अल-आदेल बनणार अल-कायदाचा म्होरक्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Aug 2022 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaif al Adel : कुख्यात दहशतवादी अल-आदेल याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे. अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर लगेचच संघटनेनं नवीन प्रमुख निवडला आहे. लादेननंतरचा अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठं यश आहे.