Russia vs Ukraine : यूक्रेनमधील युद्धाची झळ भारतालाही बसणार? युध्द झाल्यास पेट्रोल महागणार

Continues below advertisement

एकीकडे रशियानं यूक्रेनला चारही बाजूंनी घेरून हल्ला चढवण्याची तयारी केली आहे. तर असा हल्ला केल्यास रशियाची गॅस पाईपलाईन बंद करण्याची धमकी अमेरिकेनं दिली आहे. या वादात भारतासह जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यूक्रेनजवळ रशियानं तब्बल एक लाख सैनिकांना तैनात केलं आहे. त्यामुळे युरोपीय देशांबरोबरच जगाची चिंता वाढली आहे. कारण या युद्धाचा परिणाम जगभरात होणार आहे. यूक्रेनवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पुढाकार घेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा सुरु केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram