Russia vs Ukraine : रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता शिगेला, युक्रेनच्या सीमेवर एक लाख सैनिक ABP Majha
Continues below advertisement
रशियानं युक्रेनवर आक्रमणाची सर्व तयारी केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे. कारण, बेलारुस, क्रिमिया आणि युक्रेनच्या पश्चिम सीमेवर जवळपास एक लाखांहून अधिक सैनिक रशियानं तैनात केल्याची माहिती समोर येतीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनसोबतचा रशियाचा वाद संपविण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे. आणि याच कारणानं युक्रेनवरील युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. जर युद्ध झाले तर, त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशा इशारा जो बायडन यांनी दिल्याची माहिती आहे. अमेरिकेने युक्रेनमधील दूतावास खाली करण्याचे निर्देशही दिले आहेत.
Continues below advertisement