Russia Ukraine War: झेलेन्स्की नरमले, युद्ध थांबवणार? ABP Majha
१४ दिवस, ३०० तासाहून अधिक काळ युद्ध, शेकडो मृत्यू, आणि लाखो लोक देशोधडीला लागल्यानंतर आता युक्रेन नरमाईची भूमिका घेताना दिसतंय. कारण नाटो सदस्यत्वाचा आग्रह आता राहिलेला नाही असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी केलयं. युक्रेनला स्वीकारण्यास नाटो तयार नाही अशी हताश प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिलेय. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटो देश मदतीला येतील अशी अपेक्षा झेलेन्स्कींना होती. त्यांनी नाटो देशांना आणि जगालाही मदतीचा आग्रह केला. मात्र युक्रेनच्या बाजूनं भूमिका घेणाऱ्या नाटो देशांनी युक्रेनला थेट लष्करी मदत केलेली दिसली नाही. त्यामुळे युद्धात एकट्या पडलेल्या युक्रेनला मोठं नुकसान सहन करावं लागलंय. कदाचित यामुळेच हताश झालेल्या झेलेन्स्की यांनी आपण तडजोडीसाठी तयार असल्याचं सांगितलंय. क्रिमिया आणि डॉनबास यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्याबातही रशियासोबत चर्चेचे संकेत झेलेन्स्की यांनी दिले आहेत.