Russia Ukraine Crisis: युद्धांकडे नोटो देशांची पाठ, युक्रेनमध्ये विश्वासघात? ABP Majha

Continues below advertisement

रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले. लढाईत १३७ युक्रेनी नागरिक आणि सैनिक मारले गेलेत. तर रशियाचे १०० सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेननं केलाय. रशियाचं सैन्य आता युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ पोहचलं आहे. हल्ल्यात लष्करी आणि हवाई तळ लक्ष्य करण्यात आले. बॉम्बहल्ल्यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. युक्रेनमध्ये १ लाखांवर लोक बेघर झाले आहेत. चेर्नोबिल अणु प्रकल्पावरही रशियानं ताबा घेतल्याचं वृत्त आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रं रशियावर निर्बंध घालून इशारा देत असले तरी त्यांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवलेलं नाही. नाटो देशांचं सैन्य युद्धात सहभाग घेणार नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे युक्रेन एकाकी पडल्याचं चित्रं आहे. त्यातच रशियाचं सैन्य कीवजवळ पोहोचल्यानं पुढे काय होणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram