Russia Isis Attack:मॉस्कोमध्ये भीषण दहशतवादी हल्ला,70 जण मृत्युमुखी;रॉक कॉन्सर्ट सुरू असताना गोळीबार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRussia Isis Attack:मॉस्कोमध्ये भीषण दहशतवादी हल्ला,70 जण मृत्युमुखी;रॉक कॉन्सर्ट सुरू असताना गोळीबार
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे, यामध्ये ७० जणांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे जण जखमी झालेत. मॉस्कोमध्ये काल रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक आले होते. अचानक सहा ते सात हल्लेखोर शिरले, आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. १५ ते २० मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये ४० टक्के भाग जळून खाक झाला. महत्त्वाचं म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसंच, असा हल्ला होऊ शकतो याची कल्पना आम्ही रशियाला ७ मार्च रोजीच दिली होती, असं अमेरिकेनं म्हटलंय. हल्ल्यामागे युक्रेनचा हात नाही असा दावा देखील अमेरिकेनं केला आहे.