Russia Bridge : रशियात क्रिमियामधील प्रसिद्ध कर्च पुलावर स्फोट, पुलाचं मोठं नुकसान
Russia Bridge : रशियानं ताब्यात घेतलेल्या क्रिमियाला रशियाशी जोडणाऱ्या एकमेव कर्च पुलावर मोठा विस्फोट झाला आहे. एक मालगाडी पुलावर जात असताना स्फोट झाल्याने मालगा़डी आणि रेल्वे रुळाने पेट घेतला. तर रोडवरील उड्डाणपुलाचा मोठा हिस्सा कोसळला आहे. इंधन टँकरचा स्फोट झाल्याची माहिती रशियन संस्थांनी दिली आहे.