Recession 2023 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंदीचं सावट, 'या' देशांना असेल मोठं आव्हान
Continues below advertisement
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा जगावर मंदीचं सावट दाटून आलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जागतिक मंदीचा इशारा दिलाय.. २०२३मध्ये जगाचा एकतृतीयांश भाग मंदीच्या गर्तेत सापडेल, असा इशारा त्यांनी दिलाय.. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिक, युरोपियन युनियन आणि चीनसाठी हे वर्ष खूप कठीण जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. महागाई, व्याजदरातील वाढ, युक्रेन युद्ध आणि कोरोनामध्ये वाढ यामुळे जागतिक अर्थव्यस्थेला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Continues below advertisement