Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
हेही वाचा
हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानी उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर आथा पुन्हा एकदा अदानी उद्योग समूहाला पुन्हा एकदा गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्स्चेंज कमीशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकी गुंतवणूकदारांची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात आदानी यांचे भाचे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी तसेच एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवरही आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर आता अदानी उद्योग समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी ग्रुपने नेमका काय निर्णय घेतला? अदानी उद्योग समूहाच्या उपकंपन्यांनी 600 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे बॉण्ड जारी करण्याची प्रस्तावित योजना रद्द केली आहे. अदानी उद्योग समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस तसेच युनायटेड स्टेस्स सिक्योरिटिज अँड एक्स्चेंज कमिशनने अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी तसेच त्यांच भाचे सागर अदानी यांच्याविरोधात लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप केले आहेत. याच आरोपांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.