Queen Elizabeth II Funeral : राणी एलिझाबेथ II यांना अखेरचा निरोप, जगभरातून 500 प्रतिनिधी उपस्थित
Continues below advertisement
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांचं पार्थिव लंडनमधील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित आहेत. महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी वेस्टमिन्स्टर हॉलला भेट देत महाराणींचं अंत्यदर्शन घेतलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement