Operation Sindoor : आधी एक ड्रोन आला, पाठोपाठ 3 आले, पाकिस्तानी तरुणाने घटनाक्रम सांगितला!

Continues below advertisement

Operation Sindoor : आधी एक ड्रोन आला, पाठोपाठ 3 आले, पाकिस्तानी तरुणाने घटनाक्रम सांगितला! 
 
India Air Strike On Pakistan, Operation Sindoor VIDEOs:  भारताने पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला. पाकव्याप्त काश्मीरसह (Pakistan Occupied Kashmir) पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर भारतीय लष्करानं मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त (Air Strike On Pakistan) करून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike Videos) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.   भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये 'जैश ए मोहम्मद'चं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola