Pakistan PM in Court : पाक पंतप्रधानांची कोर्टात हजेरी, पाक सरकार धोक्यात?
Continues below advertisement
पाकिस्तानमध्ये आज प्रचंड हाय-व्होल्टेज ड्रामा घड़ण्याची शक्यता आहे.. कारण पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आज कोर्टात हजर राहावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी आज सुनावणी आहे.. यात जर त्यांना शिक्षा झाली, तर त्यांना पदावरून राजीनामा द्यावा लागू शकतो. जर तसं घडलं, तर पाकमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता माजण्याची चिन्हं आहेत. पाकिस्तानच्या पंजाब आणि खैरब पख्तूनख्वा प्रांतात 14 मे म्हणजे आजपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले होते. मात्र सरकारने आपल्याला निवडणुकीसाठी पैसे आणि सुरक्षा देण्यास नकार दिला, असं निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला सांगितलं, आणि यामुुळे शरीफ यांच्यासह गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोेधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणीची केस दाखल झाली.
Continues below advertisement