Pakistan : पाकिस्तानमध्ये राजकीय धुळवड, इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव

Continues below advertisement

तिकडे पाकिस्तानात राजकीय शिमगा सुरु आहे आणि अविश्वास ठरावाला सामोरं जाणारं इम्रान खान सरकार राहणार की जाणार याची चर्चा सुरु झालीय. अविश्वास प्रस्तावावर 27 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्यापूर्वीच त्यांच्या पीटीआय म्हणजेच पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाच्या खासदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. इम्रान यांच्या पक्षाचे 24 खासदार इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये राहत असल्याचं कळतंय. नाराज खासदार इम्रान खान यांच्याविरोधात मतदान करतील असं यातल्या काही सदस्यांनी पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांना सांगितलंय. पाकिस्तानच्या ३४२ सदस्यांच्या संसदेत बहुमतासाठी 172 सदस्यांची आवश्यकता आहे. इम्रान यांच्या पीटीआयचे 155 सदस्य असून त्यांना 23 इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram