PM Modi - Biden Meet : दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज, मोदी - बायडेन यांच्या भेटीदरम्यान निर्धार

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (joe Biden) यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये (White House)बैठक झाली. या भेटीत दोन देशांमधील संबंध मजबूत बनवण्यावर चर्चा झाली. तसेच  हवामान बदल आणि कोरोना बद्दल देखील चर्चा झाली.  पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती बायडन यांच्यातील निर्धारित एका तासाची बैठक दीड तासांपर्यंत सुरु होती. यावेळी बायडन यांनी म्हटलं की, पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक काळाचा दौरा निर्धारित करावा लागेल.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola