Coronavirus World Update | जगात कोरोनाचा कहर! आतापर्यंत 27 लाख 18 हजार जणांना कोरोनाची लागण
जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 91 हजारांवर गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1 लाख 91 हजार 630 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 27 लाख 18 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात सात लाख 46 हजार रुग्ण बरे झाले आहेत तर अजून जवळपास 17 सोळा लाख 81 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील तीन टक्के म्हणजे 58 हजार 690 बाधित गंभीर आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.