World Corona Update | जगभरात कोरोनाचा कहर! अमेरिकेत 24 तासांत अकराशे जणांचा बळी
जीवघेणा कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. अनेक मोठी शहरं या व्हायरसच्या दहशतीखाली आहेत. आतापर्यंत संपूर्ण जभरात जवळपास 13 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर जवळपास जवळपास 70 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन लाख 62 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. संसर्ग झालेल्यांची संख्या आता चीन आणि इटलीपेक्षाही स्पेन सर्वात पुढे आहे. तसेच, जगभरातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया कोणत्या देशांमध्ये या व्हायरचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतो.