PM US Tour : अमेरिकेतील भारतीयांकडून मोदींचं स्वागत, PM Narendra Modi यांचं मिशन अमेरिका

Continues below advertisement

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. दरम्यान, काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलसाठी रवाना होणार आहेत. तसेच अमेरिका दौऱ्यादरम्यान, मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमेरिका दौऱ्यात परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीएसोबत पहिली बैठक देखील घेणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी  बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram