India - China : भारत-चीनमध्ये लष्करी कमांडर्स स्तरावर आज 14 वी बैठक ABP Majha
Continues below advertisement
एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमध्ये लष्करी कमांडर स्तरावरील १४ वी बैठक आज होत आहे. या बैठकीत हॉट प्रिंग-डेमचोक आणि डेपसांग अशा वादग्रस्त भागाबाबत चर्चा होणार आहे. अलिकडेच गलवान घाटीमध्ये चीननं झेंडा फडकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भारताला एक इंचही जमीन देणार नाही असा प्रचार चीननं व्हिडीओ प्रसिद्ध करून सुरु केला. त्याला भारतानंही सडेतोड उत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठक होतेय.
Continues below advertisement