Kazakhstan : कझाकिस्तानात इंधन दर वाढल्यानं आंदोलनाचा भडका, सरकार पडलं!
Continues below advertisement
कझाकिस्तानात इंधन दर वाढल्यानं नागरिकांनी काल अध्यक्षीय निवास आणि महापौर कार्यालयाला आग लावली. गेले काही दिवस सुरु असलेल्या आंदोलनामुळे कझाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाली असून या संघर्षात आठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा सैनिक मारले गेले. या घडामोडींनंतर पंतप्रधान अस्कर ममिन यांनी बुधवारी राजीनामा दिला. कझाकिस्तानमध्ये सध्या आणीबाणी लागू करण्यात आलीय.
Continues below advertisement