Israel Attack : इस्राईलचा मोठा लष्करी अधिकारी हमासच्या ताब्यात? प्रकरण काय? ABP Majha

Continues below advertisement

पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडालाय. पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत येणाऱ्या परिसरांवर डझनभर क्षेपणास्त्रं डागली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली. इस्रायल सरकारनं आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्याचसोबत, २० मिनिटांत ७ हजार रॉकेट डागल्याचा दावा हमासने केला असून, हेंग्यू येथील महापौरांची हत्या केल्याचा आणि इस्राईलचा मोठा लष्करी अधिकारी ताब्यात असल्याचा दावा हमासने केलाय. त्याचसोबत, इस्रायलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलीय. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, नरेंद्र मोदी यांनी इस्राईलच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram