Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती

Continues below advertisement

Israel Hamas War : इस्रायलनं (Israel) इराणवर (Iran) मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यात इराणनं हमास प्रमुख इस्माईल हानियाला (Ismail Haniyeh) ठार केल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नं यासंदर्भात माहिती दिली. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स यांनी एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तेहरानमधील हमासच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्यावर हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्यांच्या एका रक्षकाचा मृत्यू झाला.

इस्रायलनं इराणवर मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यात इराणनं हमास प्रमुख इस्माईल हानियाला ठार केलं आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नं एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्यावर हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्यांच्या एका रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती इराण इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं निवेदनातून दिली आहे. 

पीटीआयच्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नं याची पुष्टी केली आहे. तेहरानमधील त्याच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हानिया आणि त्याचा रक्षक ठार झाल्याचं वृत्त आहे. आयआरजीसीनं दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बुधवारी सकाळी झाला आणि त्याची चौकशी सुरू आहे. यावर आयआरजीसीनं दुःख व्यक्त केलं आहे. हमासनं हानियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात हनियाची उपस्थिती आणि मंगळवारी इराणच्या सर्वोच्च नेत्याशी झालेल्या भेटीनंतर ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. 

.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram