Government of China कोरोना बाधित रुग्णांना मारण्यासाठी कोर्टात? | ABP Majha

चीन सरकारनं तब्बल २० हजार कोरोना बाधित रुग्णांना मारण्याच्या मंजुरीसाठी चीनच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं कळतंय. दरम्यान या संदर्भात कुठलीही पुष्टी झालेली नसली, तरी सोशल मीडियात मात्र यासंदर्भात कालपासून बातम्या व्हायरल होत आहेत. तरी, आतापर्यंत चीनमधील ३० हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर ६३० नागरिकांनी जीव गमावल्याची आकडेवारी मिळतेय. दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झालाय. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनच ही माहिती दिलीय.. वेनलियांग आणि इतर 8 जणांनी कोरोना नावाचा भंयकर विषाणू चीनमध्ये आल्याचं सर्वप्रथम सांगितलं होतं..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola