Iran vs Israel : इस्त्रायलचं संरक्षण करण्यास आम्ही कटीबद्ध - जो बायडन

Continues below advertisement

Iran vs Israel : इस्त्रायलचं संरक्षण करण्यास आम्ही कटीबद्ध - जो बायडन इस्त्रायलने हमासवर हल्ला चढविल्याच्या घटनेला आता सहा महिने झाले आहेत. यामध्ये पॅलेस्टाईनचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता ईराण येत्या दोन दिवसांत इस्त्रायलवर हल्ला करण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.     अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे. इराणच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनेई यांना इस्त्रायलवरील हल्ल्याचा प्लॅन सादर करण्यात आला असून ते यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. अद्याप त्यांनी यावर निर्णय घेतला नसून इस्त्रायलदेखील उत्तर आणि पश्चिमेकडील भागात इराणच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्याची तयारी करण्यात गुंतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram