IPS Krushna Prakash : IPS कृष्णा प्रकाश यांचा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी पोहण्याचा विक्रम
आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी, असा पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. त्यांनी ५ तास २५ मिनिटांत १६.२० किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पूर्ण केलंय. भारतीय जलतरणपटूंना प्रेरणा मिळावी, यासाठी कृष्णा प्रकाश यांनी ही मोहीम हाती घेतल्याचं सांगितलं.