India vs Pakistan Hockey Asian Games : भारतीय हॉकी संघाचा 10-2 असा ऐतिहासिक विजय

Continues below advertisement

भारतीय हॉकी संघानं आजवरच्या इतिहासात पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय साजरा केला आहे. एशियाडमधल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा १०-२ असा धुव्वा उडवला. भारतीय संघानं या विजयासह एशियाडच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारत आणि पाकिस्तानच्या हॉकी संघात आजवर १८० सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात पहिल्यांदाच एखाद्या संघानं आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघावर दहा गोल नोंदवण्याची कामगिरी बजावली. भारतीय हॉकी संघाच्या या कामगिरीत कर्णधार हरमनप्रीत सिंगनं सर्वाधिक चार गोलची नोंद केली. याआधी एशियाडमधल्या पुरुषांच्या स्क्वॉश प्रकारात भारतानं पाकिस्तानचा २-१ असा पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केली. स्क्वॉशच्या अंतिम लढतीत भारताच्या महेश माणगावकरला सलामीला हार स्वीकारावी लागली. पण सौरव घोषाल आणि अभय सिंगनं आपापले सामने जिंकून भारताला सोनेरी यश मिळवून दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram