India vs China : नव्या वर्षात सीमेवर मिठाई वाटण्याऱ्या चीनच्या कुरापची सुरुच ABP Majha
नव्या वर्षात चीनच्या सीमेवर कुरापती सुरूच आहेत. सीमेवर पूर्व लडाख भागातील पॅनगॉन्ग-त्सो तलावाजवळ चीनकडून एका पुलाची निर्मिती सुरु आहे. इंटेल लॅबनं जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रावरून चीनची ही कुरापत समोर आलेय. वादग्रस्त फिंगर एरिया आणि चीनच्या ताब्यातील रेचिन ला या भागांना हा पूल जोडणार आहे. पॅनगॉन्ग त्सोचा १०० किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. अशा वेळी दक्षिण सीमेवरून उत्तर सीमेवर जाण्यासाठी चीनी सैनिकांना बोटींचा वापर करावा लागतो अथवा जवळपास १०० किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्यासाठी चीनकडून ही कुरापत सुरू आहे. वास्तविक या भागातून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतलंय. मात्र तरीही चीनच्या कुरापती असल्यानं भारतानंही या भागात जवळपास ६० हजार सैन्य तैनात ठेवलंय. तसंच भारताच्या ताब्यातील भागातही मोठ्या प्रणाणात रस्ते आणि इतर सोईंची उभारणी वेगानं सुरू आहे.