Firing at Imran Khan Rally : इम्रान खान यांच्यावर गोळीबार, हल्ल्यामागे नेमकं कोण? ABP Majha

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan Ex Prime Minister Imran Khan) यांच्या गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीच्या वातावरणातून जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola