ICC World Cup 2023 : विश्वचषकात आज पाकिस्तानचा नेदरलँड्सशी सामना ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppICC World Cup 2023 : विश्वचषकात आज पाकिस्तानचा नेदरलँड्सशी सामना
आयसीसी वन डे विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानचा सलामीचा सामना आज नेदरलँडसशी खेळवण्यात येईल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दुपारी दोन वाजता सुरु होईल. पाकिस्तानच्या दृष्टीनं हा सामना जिंकणं फारस कठीण नाही. पण या विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये आशिया चषकातलं ताजं अपयश धुवून काढण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न राहिल. आधी भारत आणि मग श्रीलंकेकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आशिया चषकाची फायनल गाठता आली नव्हती. त्यामुळं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्याला पाकिस्तानचं प्राधान्य राहिल. त्यासाठी नेदरलँड्ससारख्या तुलनेत दुबळ्या संघांवर मोठा विजय साजरा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न राहिल.