Women Volleyball खेळाडूचं शीर धडावेगळं, क्रूर Talibani महिलांवरील अत्याचार कधी थांबवेल?
abp majha web team
Updated at:
21 Oct 2021 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्ता मिळाल्यानंतर तालिबान्यांकडून महिलांवर अत्याचार सुरूच राहिलेत. आता तर तालिबान्यांनी अत्याचाराचा कळस गाठलाय. अफगाणिस्तानच्या ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबील संघाच्या खेळाडूचा त्यांनी शिरच्छेद केलाय. संघाच्या प्रशिक्षकाने पर्शियन इंडीपेंडंटशी बोलताना याबाबत माहिती दिलीय. प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं. यामुळे हत्येची माहिती समोर आली नव्हती.