Glasgow Climate Change Conference : जंगलतोड संपवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार
ग्लासगो इथल्या जागतिक परिषदेतून. जंगलतोड संपवण्यासाठी करण्यात आलेल्या करारावर हस्ताक्षर करण्यास भारतानं नकार दिलाय. या करारात चीन, पाकिस्तान, नेपाळसारख्या शेजारील देशांपासून ते ब्राझिलसह १०० हून अधिक देश सहभागी झाले आहेत. पण या करारात व्यापाराशी संबंधित जोडलेल्या काही मुद्यांबाबत भारताचे काही आक्षेप आहेत. त्यामुळे भारतानं या करारावर स्वाक्षरी केली नाही असं सांगितलं जातंय. ग्लासगोमधील कॉप २६ या हवामान बदलासंदर्भातील परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. २०३० पर्यंत जंगलतोड संपवून वाढत्या कार्बन उत्सर्जनापासून पृथ्वीचं संरक्षण करण्याचं या कराराचं उद्दीष्ट आहे.
Tags :
India Glasgow Glasgow Climate Change Conference Deforestation Agreement Climate Change Conference