China Corona : प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचं जिनोम सिक्वेन्सिंग व्हावं, केंद्र सरकारचे आदेश
चीनमधली कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं आतापासूनच खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी उद्या ११ वाजता विशेष बैठक बोलावली आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचं जिनोम सिक्वेन्सिंग व्हावं, असे आदेशही केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूंची माहिती वेळेत कळावी यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगचे आदेश देण्यात आले आहेत. चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमधल्या कोरोना रुग्णांची संख्या धोकादायक पद्धतीनं वाढताना दिसत आहे.