Flying Car : आता लवकरच आकाशात उडणारी कार, कारची चाचणी यशस्वी : ABP Majha
Continues below advertisement
आकाशात कार उडवण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलं असेल, पण येत्या काळात तुमचं हे स्वप्नही पूर्ण होणार आहे.इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Xpeng ने दुबईमध्ये आपल्या फ्लाइंग कारची चाचणी केली आहे. चाचणी दरम्यान, कंपनीने आपल्या X2 फ्लाइंग कारचे पहिले यशस्वी उड्डाण केले. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन सीटच्या फ्लाइंग कारचा वेग ताशी १३० किमी असेल.चाचणीच्या वेळी या कारला ९० मिनीटापर्यंत आकाशात उडवण्यात आले.ही कार पाचशे किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्यास सक्षम आहे.त्यामुळे काही वर्षात आकाशात कार उडवण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे
Continues below advertisement