Carbon Dioxide : पृथ्वीवरील कार्बनडाय ऑक्साईडचा स्तर रेकॉर्डब्रेक पातळीवर ABP Majha
आज जागतिक पर्यावरण दिन आहे... आणि आजच्याच दिवशी आपल्या सर्वांना सतर्क करणारी बातमी.... गेल्या काही वर्षात वातावरणीय बदल, जागतिक तापमानवाढ याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देतायत. मात्र आता या सगळ्याकडे गांभीर्यानं पाहावंच लागणार आहे... कारण पृथ्वीवरील कार्बनडाय ऑक्साईडचा स्तर रेकॉर्डब्रेक पातळीवर पोहोचलाय. गेल्या वर्षात ३६0३ कोटी टन कार्बन उत्सर्जन झालंय. गेल्या ४० लाख वर्षांमधील हा सर्वाधिक कार्बनडायॉक्साईडचा स्तर असल्याची माहिती 'नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनीस्ट्रेशन' या संस्थेनं हा रिपोर्ट दिलाय