Donald Trump Twitter account Permanently suspended | ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी निलंबित

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणी आणखी वाढत असल्याचं दिसत आहे. (US Capitol) घटनेप्रकरणी जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता त्यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. (Facebook) फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola