US Terminates Relationship With WHO | जागतिक घडामोंडीचे अभ्यासक श्रीकांत परांजपे यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना (WHO) सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली. "जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातील बाहुलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत," असं ट्रम्प यांनी जाहीर केलं. दरम्यान कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत आहे.
कोरोना व्हायरसला सुरुवातीच्या स्तरापासून रोखण्यात जागतिक आरोग्य संघटनेला अपयश आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. सोबतच चीनवरही चहूबाजूंनी टीका केली. कोरोना व्हायरसच्या महामारीवरुन ट्रम्प यांनी यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.
Continues below advertisement