Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवावर कोण उठलंय? ABP Majha

Continues below advertisement

Donald Trump Special Report  :  डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवावर कोण उठलंय? ABP Majha अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूने गोळी घासून गेली. गोळी लागताच ट्रम्प खाली बसले. त्यांचा चेहरा रक्ताने काहीसा माखला होता, पण नंतर ट्रम्प मूठ आवळून निश्चयी असल्याचे दाखवून दिले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते सुरक्षित आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. तेव्हा अमेरिकेत शनिवारी संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात ट्रम्प निवडणूक रॅली करत होते.   गोळीबार होताच काय घडलं? ट्रम्प स्टेजवर भाषण देत असताना take a look at what Happens म्हणत असतानाच चिक चिक करत गोळीबाराचे आवाज आले. तेव्हा एकच आक्रोश निर्माण झाला. ट्रम्प यांच्या दिशेने गोळी येताच त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागावरून घासून गेली. यानंत एका क्षणात ट्रम्प खाली बसले. तेव्हाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रिंगण करत बाजूला केले. तेव्हा कान आणि चेहरा रक्ताने माखलेला होता. अवघ्या 12 सेकंदामध्ये हा प्रकार घडला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram