Cyclone Biparjoy LIVE: बिपरजॉयचा गुजरातला फटका, जामनगरमधलं जनजीवन विस्कळीत : ABP Majha

बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री उशिरा गुजरातवर धडकलं. चक्रीवादळाचा परिणाम आणखी काही तास राहील असं हवामान विभागानं सांगितलं आहे. चक्रीवादळामुळे भावनगरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. भावनगर येथील भंडार गावाजवळ गुरे वाचवण्याच्या प्रयत्नात पिता-पुत्र नदीच्या पाण्यात अडकले, आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान,  कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, तर मांडवी, मोरबी, पोरबंदरच्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. जखाऊ आणि मांडवीमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. तेथील अनेक भागांमध्ये झाडं कोसळली आहेत, विजेचे खांब पडलेत.. अनेक ठिकाणी पत्र्याच्या शेडही उडून गेल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola