Crude Oil Price hike : कच्च्या तेलाच्या किमती 99 डॉलर्सपार, गेल्या सात वर्षातली विक्रमी किंमत

Continues below advertisement

कच्च्या तेलाच्या किमती  ९९ डॉलर्सपार गेल्यात , गेल्या सात वर्षातली विक्रमी  किंमत आहे..  रशिया आणि युक्रेन देशातील संघर्षामुळे ब्रेंट क्रूड ऑईल महागलं आहे.. जगातील सर्वाधिक तेल उत्खनन करणाऱ्यांमध्ये रशियाचा समावेश आहे.. नवीन वर्ष 2022 मध्ये क्रूड ऑईल किंमतीत 20 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून सातत्यानेक्रूड ऑयलचे दर वाढत आहेत. 1 डिसेंबर 2021 रोजी क्रूड ऑयलची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर इतकी होती. जी आता प्रति बॅरल 97 डॉलर इतकी झाली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून ते आतापर्यंत 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑईल बाजारात जरी क्रूड ऑयलची किंमत वाढली असली, तरी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram