Coronavirus | कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण; कच्च्या तेलाचा दर उणे 38 डॉलर्सवर
Continues below advertisement
कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या रोगाशी अख्खं जग लढत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक लोक आपल्या घरांमध्ये बंद आहेत. अशातच कोरोनानंतर संपूर्ण जगावर मंदीच सावट येणार असल्याचा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्येच कच्च्या तेलाच्या किमतीत इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची किंमत बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत शून्य डॉलरपेक्षा कमी झाली आहे. वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत -37.56 डॉलर प्रति बॅरल नोंदवण्यात आली आहे. फक्त तीन महिन्यांमध्ये कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Continues below advertisement