Corona : कोरोनावरच्या औषधाची प्रतीक्षा संपली, फायझर कंपनीच्या 'पॅक्स्लोविड गोळीला अमेरिकेत मंजुरी

कोरोना होऊ नये यासाठी जगभरात अनेक लशी विकसित झाल्या पण कोरोना झाल्यास त्यावर उपचार म्हणून कोणतंही ठोस औषध उपलब्ध नव्हतं. पण आता ही प्रतीक्षा संपलेय. कोरोनावरील उपचारासाटी विकसित केलेल्या पॅक्स्लोविड या गोळीच्या वापराला अमेरिकेनं मान्यता दिले. घरी राहून आता कोरोनावर उपचार करणं शक्य होणार आहे. तसंच हा कोरोनावरील सर्वात वेगवान आणि प्रभावी उपाय असल्याचा दावा फायझरनं केला. कोरोनावरील उपचारात आजवर केवळ इंजेक्शन आणि आयव्ही द्वारे औषध देता येत होते. मात्र फायझरनं विकसित केलं पॅक्स्लोविड हे औषध मुखावाटे घेतलं जाणारं पहिलं औषध आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालायत दाखल करावे लागण्याचा धोका ९० टक्क्यांनी कमी होतो असा दावा फायझरनं केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola