Corona C.1.2 Virus चा विविध देशात शिरकाव, Corona C.1.2 Variant लशीलाही न जुमानणारा
कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक देशांमध्ये सापडला आहे जो अधिक संक्रामक असू शकतो आणि कोविडलशीलाही न जुमानणारा असू शकतो. दक्षिण आफ्रिकास्थित नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकॅबल डिसीजेस आणि क्वाझुलू नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणू C.1.2 चे नवीन रूप या वर्षी मे महिन्यात देशात पहिल्यांदा सापडले. आतापर्यंत हा फॉर्म चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्ये सापडला आहे.