China मध्ये लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरु, कारण काय? WHO ने मागितला अहवाल

Continues below advertisement

China मध्ये लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरु,  कारण काय? WHO ने मागितला अहवाल

China Pneumonia Update: कोरोनाच्या (Corona Virus Updates) उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं संपूर्ण जगाची धाकधूक पुन्हा एकदा वाढवली आहे. चीनमध्ये (China) पुन्हा एकदा एका रहस्यमयी आजारानं हैदोस घातला आहे. या रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत बोलताना चीननं सांगितलं आहे की, चीनमधील अनेक लहान मुलांमध्ये इन्फ्लूएंझा सारखे आजार पसरत आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बीजिंगला रहस्यमय आजाराबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, चिनी रुग्णालयांमध्ये अनेक आजारी लहान मुलं दाखल झाली आहे. सर्व लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत आहे. WHO नं सांगितलं की, नॅशनल हेल्थ कमिशनच्या चिनी अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram