Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनाही कोरोनाची लागण

कोरना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. सर्वसामान्यांसह प्रसिद्द व्यक्तीही कोरोनाच्या शिकार झाल्या आहेत. ब्रिटनमध्ये तर राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही घटना ताजी असताना आता ब्रिटनवासीयांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या आजाराची गंभीरता आणखीनच वाढली आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत कळवले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola